भडगावातील एका गावात२७ वर्षीय महिलेवर बलात्कार नराधमास अटक...!! - MaharashtarDiary

MaharashtarDiary

शोध महाराष्ट्राचा न्यूज, क्राईम,सोसीअल,सामाजिक,मनोरंजन ,क्रीडा ,कृषी,अपघात,राजकीय इत्यादी.

Breaking

Home Top Ad


 

Post Top Ad

 


 


 


जाहिरात ३


 

जाहिरात २

 


जाहिरात


 

रविवार, १५ मे, २०२२

भडगावातील एका गावात२७ वर्षीय महिलेवर बलात्कार नराधमास अटक...!!

 भडगावातील एका गावात२७ वर्षीय महिलेवर बलात्कार  नराधमास अटक...!!


भडगाव प्रतिनिधी :-   

   तालुक्यातील एका गावाच्या शिवारातील शेतातील विहिरीजवळ २७ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात निरू भीमसिंग उर्फ जाड्या बारेला (वय २५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.


यासंदर्भात अधिक असे की, दि. १२ मे २०२२ रोजी पीडित विवाहित महिला ही पाणी भरण्यासाठी विहीरीवर गेली होती. यावेळी निरू भिमसिंग हा देखील विहीरीवर पाणी भरण्यासाठी आला होता. यावेळी त्याने पिडीत महिलेस मागून पकडून तिच्यावर बलात्कार केला. पिडीता आरोळ्या मारीत असंताना निरू याने चापटांनी मारुन ओरडु नको नाहीतर तुझा गळा कापून टाकीन असा दम विवाहितेला दिला. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात निरू भीमसिंग उर्फ जाड्या बारेला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सपोनी चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad


 

Pages