कळमसरा येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वतीने पाचोरा पोलीस स्टेशनला निवेदन.!!!
पाचोरा ता. प्रतिनिधी :-
कळमसरा येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी! राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वतीने पाचोरा पोलीस स्टेशनला निवेदन
तालुक्यातील कळमसरा येथील दलीत मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही होवून जलद गतीने कोर्टात खटला चालविण्यात यावा.
मौजे कळमसरा ता. पाचोरा येथील दलित चर्मकार समाजाची अल्पवयीन मुलगी वय वर्ष १२ वर्ष २ महिने ही तिचा आईवडीलांसोबत गावात राहत होती.गावातील तरुणांनी तिचे
असहाय्यतेचा व ओळखीचा गैरफायदा घेवून गावातीलच तरुणांनी तिला रात्रीचे वेळेस तिला एका मुलीच्या
मदतीने निर्जन स्थळी नेले व तेथे ५-६ तरुणांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केला.
तसेच या बाबत कोणालाही सांगु नये म्हणुन तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.व रात्रभर तिच्यावर अत्याचार केला सदरहू मुलगी दलित समाजाची व अल्पयवीन असल्याने तिच्या मदतीला कोणीही धावले नाही.
अत्याचार करुन या नराधमांनी सकाळी ३ ते ४ वाजेच्या सुमारात बेशुध्दावस्थेत तिला गावाबाहेर आणून सोडले.
तिचे आईवडील तपास करीत असतांना सदर ठिकाणी मुलगी बेशुध्दावस्थेत आढळून आली, तरी अशा नराधमांना कठोरात कठोर शासन करण्यात यावे.व सदर खटाला हा फास्ट ट्रैक कोर्टात चालविण्यात यावा, अशी मागणी केली आहे.कोणत्याही प्रकारे या प्रकरणावर दडपण आणण्याचा प्रयत्न करू नये व सखोल चौकशी करुन अनुसूचीत जाती जमाती अन्याय व अत्याचार कायद्यानुसार व पोस्को कायद्यानुसार तात्काळ कार्यवाही व्हावी.तसेच अत्याचारीस मुलीस व त्यांचे कुटूंबास जास्तीत जास्त संरक्षण मिळावे. पिडीत कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही अशी शासनाने व्यवस्था करावी.व पिडीत कुटुंबाचे पुर्नवसन करण्यात यावे अधिकाधिक भरपाई शासनाच्या वतीने त्या परीवारास शासकीय मदत मिळावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
तसेच दोषींवर तात्काळ विनाविलंब कारवाई होवून पिडीतेस न्याय मिळावा, अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वतीने पीढीतेच्या व कुटुंबाचा न्यायहक्कासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परीणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदना मार्फत देण्यात आला.
या आशयाचे निवेदन पाचोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना देण्यात आले.
निवेदन देते वेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघांचे भानुदास विसावे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, पांडुरंग बाविस्कर राष्ट्रीय प्रदेश उपाध्यक्ष उत्तम मोरे,जिल्हा अध्यक्ष, पाचोरा काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, धनराज पवार राज्य सदस्य, श्रीमती लता अहिरे,सुरेखा ताई योजना ताई दिलीप वाघ, तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव.भडगाव ता. अध्यक्ष रवी अहिरे, मिलिंद अहिरे,आरपीआय तालुकाध्यक्ष विनोद आहिरे, यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा