बोदवड तालुक्यातील जामठी व जिल्ह्यातील संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव असलेले परिसरातील गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश.!!!
बोदवड प्रतिनिधी :- (सतिष बावस्कर)अंमळनेर तालुक्यातील मांडळ, मंगरुळ, अमळगांव भुसावळ तालुक्यातील साकेगांव, मुक्ताईनगर तालुक्यातील अंर्तुली, थेरोळा यावल तालुक्यातील फैजपुर यावल, साकळी, दहिगांव रावेर तालुक्यातील निंबोल, गुलाबवाडी, पिंप्री व पातोंडे धरणगांव तालुक्यातील चावलखेडा ,बोदवड तालुक्यातील जामठी, एनगाव, घानखेड, साळसिंगी व जलचक्र व पारोळा तालुक्यातील भिलाली या एकवीस ठिकाणी जनावरांमध्ये लंपी स्किन डीसीज (Lumpy Skin Disease) या साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आल्याने / एलएसडी आजाराचे जनावरे आढळुन आल्याने तसेच या रोगाचा प्रसार जिल्हयात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून अभिजीत राऊत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगांव यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार आदेश पारीत केले आहे की अंमळनेर तालुक्यातील मांडळ, मंगरुळ, अमळगांव भुसावळ तालुक्यातील साकेगांव, मुक्ताईनगर तालुक्यातील अंर्तुली, थेरोळा यावल तालुक्यातील फैजपुर यावल,साकळी,दहिगांव रावेर तालुक्यातील निंबोल, गुलाबवाडी, पिंप्री व पातोंडे धरणगांव तालुक्यातील चावलखेडा बोदवड तालुक्यातील जामठी, एनगाव, घानखेड, साळसिंगी व जलचक्र व पारोळा तालुक्यातील भिलाली या एकवीस संसर्गकेंद्रापासुन (Epicentre) १० कि.मी बाधित क्षेत्र (Infected zone) म्हणुन घोषीत करण्यांत येत आहे. त्या अनुषंगाने बाधीत क्षेत्रातील जनावरांचे शेड निजंतुकीकरण करुन १० कि.मी परिघातील परिसरात जनावरांची खरेदी विक्री, वाहतुक बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजीत करणेस प्रतिबंध घालण्यात येत आहे. प्रादुर्भाव भागातील इतर जनावरांना संसर्ग होउ नये या दृष्टीने वरील ५ कि.मी परिघातील जनावरांना गोट पॉक्स (Goat pox) प्रतिबंधात्मक लसीकरण तात्काळ करणेत यावे. या करिता जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी ते नियोजन करुन १०० टक्के करावे.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा