गोरगावले खुर्द येथील कॉंक्रीट रस्त्याजवळ रॅम्प बनवण्यात यावा..!!! - MaharashtarDiary

MaharashtarDiary

शोध महाराष्ट्राचा न्यूज, क्राईम,सोसीअल,सामाजिक,मनोरंजन ,क्रीडा ,कृषी,अपघात,राजकीय इत्यादी.

Breaking

Home Top Ad


 

Post Top Ad

 


 


 


जाहिरात ३


 

जाहिरात २

 


जाहिरात


 

मंगळवार, १७ मे, २०२२

गोरगावले खुर्द येथील कॉंक्रीट रस्त्याजवळ रॅम्प बनवण्यात यावा..!!!

 गोरगावले खुर्द येथील कॉंक्रीट रस्त्याजवळ रॅम्प बनवण्यात यावा..!!!


गोरगांवले बुद्रूकचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी.


जिल्हा  प्रतिनिधी :-     

     चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द येथे कॉंक्रिटचा नवीन रस्ता बनविण्यात आला आहे.ह्या रस्त्याला लागूनच गावाबाहेरून स्मशानभूमी व शेतीकडे जाणारा रस्ता आहे.याठिकाणी उंचवटा झाल्याने शेतकऱ्यांचे गाडीबैल ट्रॅक्टर गुरेढोरांसह शेतमजुर आबालवृद्ध अपंग तसेच स्मशानभुमीकडे प्रेतयात्रेसाठी जाणाऱ्या शेकडों लोकांना सुध्दा ह्या रस्त्यावर चढायला किंवा उतरायला खुपच त्रास होत आहे.याठिकाणी किरकोळ अपघातही होत आहेत.याबाबत येथील ग्रामस्थांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना सांगीतले असता त्यांनी स्पष्ट नकार दिल्याने ग्रामस्थांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.ग्रामस्थं त्याचठिकाणी रस्ता अडविण्याच्या प्रयत्नात आहेत.याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहिल,असेही येथील सामा.कार्यकर्ते भिका ठाकरे यांनी सांगीतले आहे.


शेतकऱ्यांसह गुराढोरांना होणारा त्रास वाचवावा..

       चोपडा ते जळगांव ह्या नविन राज्यमार्गावरील प्रत्येक गावात कॉंक्रीटचा रस्ता बनविण्यात आला असुन मुख्य काँक्रीट रस्त्याला जोडणारा उपरस्ता जिथे येतो तिथे पाच ते सात फुटाचा ज्वॉईंट रॅम्पटाईप रस्ता बनवण्यात आला आहे. संबंधित विभागाने गोरगांवले खुर्द येथेही तसाच रैम्पटाईप उपरस्ता बनवून ग्रामस्थांसह गुराढोरांना होणारा त्रास वाचवावा.अन्यथा येथे लहानमोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad


 

Pages