रामवाडी ग्रामस्थ नागरी सुविधांपासून वंचित.!!!
पेण ( विनायक पाटील ) :- रामवाडी ग्रामस्थ नागरी सुविधांपासून वंचित असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या परिसरातील गटारांची अवस्था खूपच वाईट आहे. तर बऱ्याच ठिकाणी गटारे झाली नसल्याने पावसाळ्यात गटारे तुंबण्याचे प्रकार नेहमीच होत असतात. त्यामुळे घरांमध्ये पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहेत. याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. गटारांची अशी अवस्था असताना ठिकठिकाणी बरेच दिवस कचरा उचलला जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसत होते. याबाबत नागरिकांनी आवाज उठविल्यानंतरच कचरा उचलला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नगरपालिका प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रामवाडी येथे नगर परिषद असतानाही नागरीकांना अनेक नागरी सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त करताना ग्रामीण भागातील ग्रामपंचायत मधील गावागावात चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्याच्या भावना त्यांनी बोलून दाखविल्या. रामवाडीमध्ये काही भागात शौचालयाची टाकी भरल्यानंतर तो साफ करण्यासाठी गाडी येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असून त्या लोकांनी संडासाचे पाणी रस्त्यावर सोडायचे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर का एकाद्या घराला चुकून आग लागली तर ती विझविण्यासाठी तेथे फायर ब्रिगेडची गाडी पण पोहचू शकत नाही. ही समर्थनगर रामवाडील नागरिकांसाठी फार मोठी शोकांतिका आहे. कधी या गोष्टींकडे नगरपालिकेचे लक्ष केंद्रित होईल.शहरांपेक्षा गाव बरा असेच आता रामवाडील नागरिकांना वाटू लागले आहे.











कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा