आंतरराष्ट्रीय खेळाडू कु.प्रणिता पवार इयत्ता १० वी मध्ये ९३%गुण घेऊन यश संपादन केल्याबद्दल मनसेच्या वतीने कौतुक.!!!
तुळजापूर प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग:- श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूस पराभूत करून भारताला सुवर्णपद मिळवून देणाऱ्या रामतीर्थ (नळदुर्ग) येथील कु.प्रणिता मोहन पवार हिचे वडील कोविड मध्ये सोडून गेले. वडिलांचे छत्र हरवल्याने परिस्थिति हालक्याची झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी प्रणिताच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. कठिन परिस्थितित ही अभ्यास करून इयत्ता १० वी मध्ये ९३% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केल्याने अनेकांना आनंद झाला आहे. मनसेच्या पदाधिका-यांनी फोन वरुन कु.प्रणिताला अभिनंदन करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा