सोयगाव तहसील कार्यालयावर बसपचा विविध मागण्यांसाठी मोर्चा.!!!
नागरिकांची आर्थिक पिळवणूक थांबवा मोर्चेकरांची मागणी...
सोयगाव प्रतिनिधी :-
सोयगाव,दि.०५...सोयगाव तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांची होणारी लूट थांबवा,शिधापत्रिकाधारकांची होणारी पिळवणूक आणि यासह इतर पाच मागण्यांसाठी मंगळवारी सोयगाव तहसील कार्यालयावर बसपाचे तालुकाध्यक्ष संघपाल सोनवणे यांच्या नेतृर्वाखाली बसपाचा मोर्चा धडकला यावेळी बसपा सिल्लोड-सोयगाव कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने दोन तास निदर्शने करून निषेध केला.तहसीलदार रमेश जसवंत यांना विविध मागण्यांचे निवेदन संघपाल सोनवणे यांनी सुपूर्द केल्यावर तहसीलदार रमेश जसवंत यांनी मागण्यांचे आश्वासन दिले.
सोयगाव तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मंगळवारी बहुजन समाज पार्टीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी शहरातील शिवाजी चौकातून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व बसपाचे तालुकाध्यक्ष संघपाल सोनवणे यांनी केले मोर्चेकरांनी शांततेत तहसील कार्यालयावर धडकल्यावर मागण्या पूर्ण होण्यासाठी दोन तास प्रशासनाच्या विरीधात निदर्शने केली.बहुजन समाज पक्षाच्या या मोर्चातील सर्वसामान्य शेतकऱ्यांजवळ दंडाची पावती असूनही वनविभागाकडून होणारा गायरान जमिनीबाबत त्रास दूर करावा,शिधापत्रिकाधारकांची तहसील कार्यालयात ऑनलाईन साठी करण्यात येणारी पिळवणूक तसेच शासकीय कामासाठी आर्थिक लूट करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीने चौकशी करून कारवाई करावी,संजय गांधी निराधार योजनेच्या संचिका मंजुरी न देता धूळखात पडून असल्याने लाभार्थ्यांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा अशा विविध पाच मागण्यांसाठी बहुजन समाज पक्षाच्या वतीने मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष संघपाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकातून निघालेला भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी साब्घ्पाल सोनवणे यांच्यासह शिष्ट मंडळाने तहसीलदार रमेश जसवंत यांना मागण्यांचे निवेर्दन दिले.यावेळी बसपा सिल्लोड-सोयगाव विधानसभा पदाधिकारी सचिन बनसोडे,बाबासाहेब पगारे,अक्रम शेख,अमोल पवार,संदीप जोगदंड,राजू रोजेकर,राजू दांडगे,दीपक आव्हाड,यांचेसह रवींद्र सोनवणे,रमेश इंगळे,बापू निकम,गौतम जोंधळे,नाना सोनवणे,आत्माराम सोनवणे,दादामिया,भावूसाहेब पाटील,सिद्धार्थ सोनवणे,महेंद्र पाटील,कडूबा डोलारे,शशिकांत मोरे,शिवराम जाधव,किरण लोहार,देविदास महाजन,बापू साळवे,संतोष शिंदे,आदींसह तालुक्यातील बसपाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.











कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा