आमदार विक्रम काळे यांचा सोयगाव येथे शिक्षक दरबार.!!!
संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात जाणून घेतल्या तालुक्यात समस्या....
सोयगाव, दि.०२ (दिलीप शिंदे सोयगाव) जिल्हाभर भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमध्ये जुंपली असताना,शिक्षकांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शुक्रवारी सोयगाव तालुक्यात दौरा केला या दौऱ्यात त्यांनी फर्दापूर,सावळदबारा,देव्हारी,सोयगाव, घाणेगाव तांडा,जामठी, मोलखेडा,आदी शाळांना भेटी देत त्या शाळेतील मूलभूत सुविधा, तसेच शिक्षकांच्या अडचणी समजून घेतल्या
दरम्यान या दौऱ्याचा समारोप सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे शिक्षक दरबार आयोजित करून केला.या शिक्षक दरबारात सोयगाव तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या दूर करण्यासाठी आमदार विक्रम काळे यांनी समस्या जाणून घेतल्या. त्यांनी शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. यापुढे ही प्रयत्न करत राहील असे आश्वासन त्यांनी दिले.: यावेळी शिवाजी बनकर पाटील, प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शिरीष पवार यांनी केले तर आभार डॉ शंतनू चव्हाण यांनी मानले, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे अनुदान, शिक्षकांचे पदोन्नती, प्राध्यापक यांचे विविध प्रश्न यासंबंधी त्यांनी विचार मांडले










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा