येवती येथे जगात वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली आज एक आगळी वेगळी दिवाळी.!!! - MaharashtarDiary

MaharashtarDiary

शोध महाराष्ट्राचा न्यूज, क्राईम,सोसीअल,सामाजिक,मनोरंजन ,क्रीडा ,कृषी,अपघात,राजकीय इत्यादी.

Breaking

Home Top Ad


 

Post Top Ad

 


 


 


जाहिरात ३


 

जाहिरात २

 


जाहिरात


 

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

येवती येथे जगात वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली आज एक आगळी वेगळी दिवाळी.!!!

 येवती येथे जगात वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली आज एक आगळी वेगळी दिवाळी.!!!

 (जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर)

बोदवड-येवती येथे सण उत्सव हे परंपरेने चालत आलेले आहे हे साजरे करत असतांना स्थानिक मान्यता येवती ता - बोदवड . जि - जळगाव येथे आज साजरी होणार आगळी वेगळी दिवाळी . सर्वसाधारणपणे दिवाळीचा सण वसुबारस पासून सुरू होऊन दर्श अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजन ,बलिप्रतिपदा, भाऊबीज अशी साजरी केली जाते. मात्र बोदवड तालुक्यातील येवती येथे दिवाळी व भाऊबीज एकाच दिवशी साजरी करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. या दिवाळीस करदोडा दिवाळी तसेच अंबई बुवाची दिवायी असे जुने लोक म्हणतात. आज अंबऋषी ची दिवाळी नावाने ओळखली जाते.येवती या छोट्या खेड्यात विविध जातीय लोकांचा रहिवास आहे मुस्लिम धर्मीय सुद्धा आहेत . गावात ही परंपरा सुरू होण्याचे कारण गावातील जुने लोक सांगतात की खूप वर्षांपूर्वी काहीतरी साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव गावात दिवाळीच्या आधी झाला या रोगा पासून वाचण्यासाठी गावा जवळील शेतात वास्तव्यास असणाऱ्या अंबऋषी नामक संतांनी गावातील सर्व लोकांना गाव सोडून शेतात आश्रय घेण्यास सांगितले त्या मुळे रोगाचा प्रादुर्भाव गेला मात्र दिवाळी व भाऊबीज साजरी करण्याची राहून गेली त्या साठी या ऋषींनी भाऊबीजेच्या नंतर येणारी चतुर्थी किंवा पंचमी च्या दिवशी सोमवार किंवा शुक्रवार जो वार पहिले येईल त्या एकाच दिवशी दिवाळी व भाऊबीज साजरी करण्यास सांगितले आणि ही प्रथा सुरू झाली . अंबऋषी यांच्या मुळे रोगापासून गाव वाचले व त्यानंतर त्यांनी सण कसा साजरा करावा हे सांगितल्याने या दिवाळीस स्थानिक बोलीत अंबई बुवाची दिवायी तसेच करदोडा दिवायी असेही जुने लोक म्हणतात अंबऋषी ची दिवाळी नावाने ओळखल्या या दिवशी गावाजवळील वानखेडे यांच्या शेतात असलेल्या अंबऋषींच्या मंदिरामध्ये सायंकाळी आरती होते आणि गावातील सर्व महिला आपापल्या घरचा नैवेद्य वडे, पुरणपोळी, ई .घेऊन मंदिरासमोरील शेतात एकत्र येतात आणि पणत्या लावतात व सामुहिक आरती झाल्यानंतर अंबऋषीस करदोडा अर्पण करून बहिणी भावांना ओवाळतात. यावेळी गावात फटाके फोडून मुले दिवाळी साजरी करतात. हा सण साजरा करण्यास विवाहित बहिणी गावात येतात तसेच नोकरी कामानिमित्त बाहेर गावी गेलेले लोक गावी येतात. येवती येथे साजऱ्या होणाऱ्या या दिवाळीस आसपासच्या गावातील लोकसुद्धा सहभागी होत असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad


 

Pages