ट्रक लुट प्रकरणी तीन चोरांसह एक महिलेला अटक ; पारोळा पोलीसांची कारवाई.!!! - MaharashtarDiary

MaharashtarDiary

शोध महाराष्ट्राचा न्यूज, क्राईम,सोसीअल,सामाजिक,मनोरंजन ,क्रीडा ,कृषी,अपघात,राजकीय इत्यादी.

Breaking

Home Top Ad


 

Post Top Ad

 


 


 


जाहिरात ३


 

जाहिरात २

 


जाहिरात


 

शनिवार, १४ मे, २०२२

ट्रक लुट प्रकरणी तीन चोरांसह एक महिलेला अटक ; पारोळा पोलीसांची कारवाई.!!!

 ट्रक लुट प्रकरणी तीन चोरांसह एक महिलेला अटक ; पारोळा पोलीसांची कारवाई.!!!

आठ दिवसात सर्व चौघे आरोपी ताब्यात....

               पारोळा प्रतिनिधी :-

 ट्रक लुटीच्या गुन्ह्यातील महिला आरोपीला पारोळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अवघ्या ८ दिवसात या गुन्ह्यात ३ पुरुष व एक महिलेला अटक करण्यास पारोळा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.


         पारोळा येथे महामार्ग क्रमांक सहावर ४ रोजी मध्यरात्री दोन ट्रक चालकांना मारहाण करून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाइलची चोरट्यांनी लूट केली होती. या प्रकरणात कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अनुभवाच्या बळावर अवघ्या काही तासात ३ स्थानिक संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर या संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक केली होती.


परंतु, या गुन्ह्यात एक महिला संशयिताचा ही समावेश असून ती फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, या गुन्ह्यातील राजीव गांधी नगरमधील संशयित महिला ज्योती गोपी पाटील ही तिच्या जावयाच्या घरी जात असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. या महिलेला पारोळा पोलिसांनी प्रवासात सापळा रचून आडगाव येथे ताब्यात घेतले. या पथकात पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलिस उपनिरीक्षक जाधव, महिला पोलिस कर्मचारी मोरे, पोलिस नाईक सुनील साळुंखे, संदीप सातपुते, कॉन्स्टेबल किशोर भोई, राहुल कोळी, हेमचंद्र साबे, राहुल पाटील यांनी यांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad


 

Pages