अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार - MaharashtarDiary

MaharashtarDiary

शोध महाराष्ट्राचा न्यूज, क्राईम,सोसीअल,सामाजिक,मनोरंजन ,क्रीडा ,कृषी,अपघात,राजकीय इत्यादी.

Breaking

Home Top Ad


 

Post Top Ad

 


 


 


जाहिरात ३


 

जाहिरात २

 


जाहिरात


 

शनिवार, १४ मे, २०२२

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

 अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार :

पाचोरा तालुक्यातील घटना.!!!


पाचोरा प्रतिनिधी :-

   पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार आज पहाटे समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १३ मे रोजी रात्री ९ वाजता गल्लीतील मैत्रीणीसोबत बोलत होती. त्यानंतर मात्र अल्पवयीन मुलगी गायब झाली. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून 

तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला. गावातील २० ते २५ जणांनी दुचाकी काढून गावातील आजूबाजूच्या शेतात शोधमोहिम राबविली. गावातील वातावरण शांत झाल्यानंतर अज्ञात ५ ते ६ जणांनी १४ वर्षीय मुलीला उचलून नेत तिच्यावर सामूहिकरित्या अत्याचार केला आणि पिडीत मुलीला पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात नराधमांनी तिच्यावर शौचालयाजवळ सोडून दिले. अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीला आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पिडीत मुलीला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत अद्याप पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. शेवटचे वृत्त हाती आले पिडीत मुलीचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान संशयित आरोपी हे गावातीलच असल्याची दाट शक्यता असून त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad


 

Pages