वारसा जनसेवेचा.!!!
वसा सामाजिक बांधिलकीचा जोपासणारा मंत्रीपुत्र•••
जिल्हा प्रतिनिधी :-
जनसेवेच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या कामात खंड पडू नये यासाठी पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांचे लहान चिरंजीव विक्रमराव जळगाव ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांच्या सुखदुःखात भेट देत आहेत.
20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक असल्याने मंत्रीमहोदयांवर पक्षाने विशेष जबाबदारी टाकलेली आहे या कामानिमित्त मंत्रीमहोदय मुंबई येथे आहेत.
जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव हे तिरुपती बालाजी येथे दर्शनाला गेलेले आहेत. जनसेवेत व्यत्यय येऊ नये यासाठी मंत्रीमहोदयांचे लहान चिरंजीव विक्रमराव सुखदुःखात भेट देत आहेत.
पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य सभा पार पडली. या सभेत त्यांनी त्यांच्या अफाट जनसंपर्काचे गुपित सांगितले की त्यांचा जळगाव ग्रामीण मतदारसंघात प्रत्येक सुखदुःखात हजेरी लावण्याचा प्रयत्न असतो. ज्या दिवशी मंत्रीमहोदय मतदारसंघाच्या बाहेर मुंबईला असतील किंवा स्वतः पोहोचू शकत नाहीत त्या ठिकाणी त्यांचे मोठे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हजेरी लावतात.
मतदारसंघातील नागरिकांचे सुख असो दुःख प्रत्येक परिस्थितीत धावून जाणारे मंत्रीमहोदय व प्रताप भाऊ प्रत्येकाच्या घरी भेट देतात कोणालाच नाराज करत नाही. सर्व ठिकाणी हजेरी लावण्याचा अट्टहास असतो.
जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील एक दिवसात 40 लग्नाच्या पत्रिका असतील तरी हळद व लग्न मुहूर्त यापैकी एका वेळी 40 ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात.
आता वडील आणि मोठे बंधू यांच्या पावलावर पाऊल टाकत विक्रमराव जनसेवेत खंड पडू देत नाही याचे जळगाव ग्रामीण मतदारसंघातील नागरिक विशेष कौतुक करत आहेत.
संपूर्ण पाटील कुटुंबाने जनसेवेसाठी वाहून घेतलेले आहे. लोकांकडून भरभरून मिळणाऱ्या प्रेमाची भरपाई पाटील कुटुंबीय या माध्यमातून करत आहेत.
तुम्ही फक्त आवाज द्या तुमच्या सुखदुःखात आम्ही कायम सहभागी आहोत असा संदेश या निमित्ताने पाटील कुटुंबीय देत आहेत.











कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा