जिद्द, मेहनत व चिकाटीने उभे राहिल्यास यशाचे दालन उघडले जाईल- बापूसाहेब नेने.!!!
पेण ( विनायक पाटील ): "विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रात चमक दाखवून आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला पाहीजे. आज तुम्हाला सोबतीची मदत मिळत आहे. शिक्षण घेऊन यशस्वी झाल्मानंतर तुम्ही सोबतीचे स्पॉन्सर झालात तर आम्हाला वेगळाच आनंद मिळेल. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यासमोर अनेक आव्हाने आहेत. त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी जिद्द, मेहनत व चिकाटीने उभे राहिल्यास यशाचे दालन उघडले जाईल. तुम्ही उद्याचे जबाबदार नागरिक आहात, त्यासाठी कठोर मेहनत घ्या. यश आपोआप तुमच्या पायाशी येईल." असे उद्गार सोबती संस्थेचे अध्यक्ष बापुसाहेब नेने यांनी बोरी येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले.
मराठी पत्रकार परिषद कोकण विभागीय सचिव विजय मोकल, कल्याणी नंदकुमार पाटील, उपसरपंच रविंद्र म्हात्रे व किरण म्हात्रे यांच्या प्रयत्नाने बोरी परिसरातील विद्यार्थ्यांचे प्रतिपालकत्व सोबती संस्थेने स्विकारले आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच छत्री व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सोबतीचे अध्यक्ष बापुसाहेब नेने, शुभांगी नेने, विजया जगडे, बोरी ग्रा.पं. उपसरपंच रविंद्र म्हात्रे, कल्याणी पाटील, तुकाराम म्हात्रे, स्मिता मोकल, विजय मोकल, पत्रकार विनायक पाटील, प्रकाश माळी, रुपेश गोडीवले, अक्षय गावंड आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोबती संस्था पंधराव्या वर्षात पदार्पण करीत असून सोबतीचे बोरी गावाशी विशेष नाते आहे. त्यामुळेच गेल्या पंधरा वर्षात विविध उपक्रमातून सोबतीच्या माध्यमातून तुमची व आमची भेट होत आहे. त्यातुन एक वेगळाचा ऋणानुबंध जुलून आला आहे. तो या पुढेही असाच राहील. असे बापूसाहेब नेने यांनी सांगितले.
प्रास्ताविक विजय मोकल यांनी केले. आभार तुकाराम म्हात्रे यांनी मानले. यावेळी रविंद्र म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी उपयुक्त होइल असे मार्गदर्शन केले.












कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा