लॉकडाऊन काळात सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी व्ही स्कूल अँप ची निर्मिती करण्यात आली.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
लॉकडाऊन काळात सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी व्ही स्कूल अँप ची निर्मिती करण्यात आली. याच व्ही स्कूल अँप च्या पाठनिर्मितीत शैक्षणिक साहित्य निर्माण करून महत्वाचे योगदान दिल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात भडगाव येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालविकास प्राथमिक विद्यामंदीर शाळेचे उपशिक्षक श्री विकास राजाराम झोडगे व श्री सागर विलास महाजन यांचा जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला पालक मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. पंकज आशीया, जिल्हाधिकारी मा.श्री. अभिजित राऊत, वॉवेल्स ऑफ द पिपल असोसिएशनचे संस्थापक प्रफुल्ल शशिकांत, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, आमदार श्री.संजय सावकारे उपस्थित होते. अँपवरील शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी श्री विकास झोडगे यांची तंत्रस्नेही शिक्षक म्हणून तर सागर महाजन यांची पाठनिर्मितीसाठी निवड करण्यात आली होती. सागर महाजन यांचे गणित विषयाचे पाच पाठ व्ही स्कूल अँप वर प्रसारित झाले असून असे ते भडगाव तालुक्यातील पहिले शिक्षक ठरले आहेत.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा