गोंडगाव येथे जगतगुरु जनार्दन स्वामींच्या पुण्यस्मरणार्थ राष्टृनिर्माण धर्म सोहळा.विविध कार्यक्रमांचे आयोजन. नियोजनार्थ बाबाजी परीवाराची बैठक.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने व श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने श्री क्षेत्र गोंडगाव ता भडगांव. येथे दि.२८ नोव्हेंबर २००२२ ते ५ डिसेंबर २०२२ ला राष्ट्रसंत जगतगुरू जनार्दन स्वामींच्या पुण्यस्मरणार्थ राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा आयोजित केला आहे. तसेच कै. विजयकुमार सुदर्शन अहिरे यांच्या संकल्प प्रमाणे प.पूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी बाबाजींच्या ३३ व्या पुण्यस्मरणार्थ राष्ट्र निर्माण धर्म सोहळ्यात पुरुष व महिला जपानुष्ठान ,एकनाथी भागवत पारायण, ३३ कुंडी यज्ञाचे तसेच नामसंकीर्तन जप,अखंड नंदादीप, हस्तलिखित जप साधना,कीर्तन सप्ताह इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. गोंडगाव येथे बाबाजींच्या कुटीयाजवळ जय बाबाजी परीवाराची नियोजना बाबत बैठक पार पडली.
या धर्म सोहळ्याचे मार्गदर्शनासाठी वेरूळ चे विश्वस्त जेष्ठ गुरुबंधु शिवकाका अंगुलगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या बैठकीला गोंडगावची स्थानिक कमिटी व जिल्हा कमिटीचे नियोजन करण्यात आले आहे. बैठकीची प्रस्तावना धरणगावचे तालुका सेवक दगडू गुरुजी यांनी सुरुवात करत बैठकीत जळगाव जिल्हा सेवक संजय पाटील, जिल्हा संपर्क सेवक आंबरसिंग पाटील व गोंडगावातील पी के मोरे ,रामचंद्र पाटील, पाचोऱ्याचे सेवक राजेंद्र पाटील व धुळ्याचे जिल्हा सेवक रोहिदास पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या बैठकीला भडगाव तालुका सेवक अशोक पाटील ,पारोळा तालुका सेवक रविंद्र पाटील,धरणगावचे तालुका सेवक दगडू गुरुजी ,जामनेर चे तालुका सेवक डॉ परदेशी, यावलचे प्रकाश पाटील अमळनेर चे कैलास महाजन, अरुण बोरसे जळगाव जिल्हा सहसेवक अजय पाटील राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष राहुल पाटील उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी या धर्म सोहळ्याच्या मुख्य कमिटीचे अध्यक्ष डॉ गणेश सुदर्शन अहिरे व जिल्हा कमेटिचे उपाध्यक्ष समाधान पाटील यांनी सांगताप्रती आभार मानले. तसेच गोंडगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जय बाबाजी भक्त परिवार हा मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या धर्मसोहळ्यासाठी प्रसिद्धि मेडिया प्रमुख वार्ताहर अशोक परदेशी यांची नेमणुक करण्यात आली.
महाश्रमदान सोहळ्या अंतर्गत जय बाबाजी भक्त परिवाराने दि.२२ऑगस्ट२०२२रोजी सकाळी ८ ते ९ या एका तासात ५ लाख महावृक्षारोपण आपल्या मुलांच्या हस्ते करून देशभक्तीची भावना जागृत करून पर्यावरणाच्या रक्षणार्थ देशसेवा म्हणून जे कर्म आपण केले. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
फोटो — गोंडगाव येथे बैठकीत मार्गदर्शन करतांना डाॅ. गणेश अहिरे व उपस्थित जय बाबाजी परीवारातील भक्त.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा