वडगाव बुद्रुक येथे १ गाव १ गणपती. जनजागृतीचा मिळतोय संदेश. आम्ही वडगावकर मिञ मंडळाचा आदर्श.अशोक परदेशींच्या हस्ते आरती.!!! - MaharashtarDiary

MaharashtarDiary

शोध महाराष्ट्राचा न्यूज, क्राईम,सोसीअल,सामाजिक,मनोरंजन ,क्रीडा ,कृषी,अपघात,राजकीय इत्यादी.

Breaking

Home Top Ad


 

Post Top Ad

 


 


 


जाहिरात ३


 

जाहिरात २

 


जाहिरात


 

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

वडगाव बुद्रुक येथे १ गाव १ गणपती. जनजागृतीचा मिळतोय संदेश. आम्ही वडगावकर मिञ मंडळाचा आदर्श.अशोक परदेशींच्या हस्ते आरती.!!!

 वडगाव बुद्रुक येथे १ गाव १ गणपती. जनजागृतीचा मिळतोय संदेश. आम्ही वडगावकर मिञ मंडळाचा आदर्श.अशोक परदेशींच्या हस्ते आरती.!!!


भडगाव प्रतिनिधी :-

 तालुक्यातील वडगाव बुद्रुक गावात १ गाव १ गणपती स्थापन नवतरुणांनी एकञ निर्णय घेउन केली आहे.आम्ही वडगावकर मिञ मंडळामार्फत ८ फुट उंचीची गणेश मुर्ती स्थापन केलेली आहे. यात आकर्षक विदयुत रोषणाईसह व्यसनमुक्ती, बेटी बचाओ, स्वच्छ भारत मिशन, शेतकरी आत्महत्या, वृक्षलागवड, यासह जनजागृतीपर डीजीटल फलक आकर्षण ठरत आहे. झाडावर आकर्षक विदयुत रोषणाईतुन राञीच्या वेळी तिरंगा झेंडा आकर्षण बनले आहे. सर्व नवतरुण भाविक रोज पुजा, अर्चा करुन परीश्रम घेत आहेत. श्री. गणेशाची स्थापना येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. नागरीक, महिला, तरुण मंडळी रोज दर्शनासह कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत. गणेशोत्सवानिमित्त रोज संगीत खुर्चीसह इतर कार्यक्रम होत आहेत. वृक्षलागवडीचाही कार्यक्रम होणार आहे. दि. १ रोजी सायंकाळी भडगावचे पञकार अशोक परदेशी यांचे सह सपत्नीक हस्ते आरती व पुजा करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad


 

Pages