श्री क्षेञ गोंडगाव येथे जगतगुरु जनार्दन स्वामी यांच्या ३३ वे पुण्यस्मरणा निमित्त राष्टृनिर्माण धर्म सोहळा संपन्न.!!! - MaharashtarDiary

MaharashtarDiary

शोध महाराष्ट्राचा न्यूज, क्राईम,सोसीअल,सामाजिक,मनोरंजन ,क्रीडा ,कृषी,अपघात,राजकीय इत्यादी.

Breaking

Home Top Ad


 

Post Top Ad

 


 


 


जाहिरात ३


 

जाहिरात २

 


जाहिरात


 

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

श्री क्षेञ गोंडगाव येथे जगतगुरु जनार्दन स्वामी यांच्या ३३ वे पुण्यस्मरणा निमित्त राष्टृनिर्माण धर्म सोहळा संपन्न.!!!

श्री क्षेञ गोंडगाव येथे जगतगुरु जनार्दन स्वामी यांच्या ३३ वे पुण्यस्मरणा निमित्त राष्टृनिर्माण धर्म सोहळा संपन्न.!!!


 १२ सजविलेल्या बैलगाडयांवर आकर्षक सजीव देखावे, घोडयांवर शिवाजी महाराज, झाशीची राणी सजीव देखाव्यांसह भव्य शोभायाञा ठरले आकर्षण


भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र गोंडगाव येथील आश्रमात संत जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या ३३ वे पुण्यस्मरण निमित्त होत असलेला राष्ट्र निर्माण धर्म सोहळा दि. २८ /११/२०२२ ते ५ /१२/२०२२ डिसेंबर या पर्वकाला मध्ये संपन्न होणार आहे. त्या सोहळ्याचा ध्वजारोहण कार्यक्रम उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज यांच्या शुभहस्ते गोंडगाव येथे बाबाजींच्या आश्रमात करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच १२ सजविलेल्या बैलगाडयांवर आकर्षक सजीव देखावे व सजविलेल्या घोडयावर शिवाजी महाराज यांची वेषभुषा शिवव्याख्याते दत्ताञय श्रावण मांडोळे यांनी साकारली. तर घोडयावर स्वार झाशीची राणी यांची वेषभुषा कोमल नेहरु पाटील या मुलीने साकार केली.यावेळी महीलांनी घरोघरी औक्षण केले. सर्व आकर्षक सजीव देखावे गावातुन निघालेल्या शोभायाञा मिरवणुक खास आकर्षण ठरले. यावेळी शोभायाञेत एका सजविलेल्या बैलगाडयावर श्री. शांतीगीरी महाराज व सोबत पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे ही सहभागी होते. यावेळी शोभायाञा मिरवणुकीत पाचोरा भाजपाचे अध्यक्ष अमोल शिंदे, डाॅ. भुषण मगर, माजी नगरसेविका योजना पाटील, मेडीकल असोसीयशनचे अध्यक्ष सुरेश भंडारी यांचेसह नागरीक, महिला मोठया संख्येने सहभागी होते. यावेळी भक्तीमय गितांनी परीसर भक्तीमय वातावरण झाल्याचे दिसुन आले. ओम जनार्दनाय नमा, ओम जनार्दनय नमा अशा बाबाजींच्या नावाने घोषणाही देण्यात आला. उपस्थित राष्ट्र निर्माण धर्म सोहळा मुख्य समिती व चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील, पाचोरा भा. ज.पा.अध्यक्ष अमोल शिंदे , पाचोरा डॉक्टर भूषण मगर , सोहळयाचे अध्यक्ष डाॅ. गणेश अहिरे, उपाध्यक्ष समाधान पाटील फौजी, भडगाव माजी नगर सेविका योजना पाटील , मेडीकल अॅसोसीएशनचे अध्यक्ष सुरेश भंडारी , पत्रकार अशोक परदेशी , जि प सदस्य हिंमत पाटील आदिंच्या हस्ते ध्वजारोहण विविध ठिकाणी करण्यात आले. लिलावती फौंडेशनचे अध्यक्ष डॅा. प्रमोद पाटील , जय बाबाजी भक्त परिवाराचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, अमरसिंग पाटील हे ही हजर होते. १२ सजविलेल्या बैलगाडयांवर सजीव देखावे याप्रमाणे होते. यात अनुष्ठान, यज्ञ, नंदादीप, सार्थ एकनाथी भागवत, हस्तलिखीत जप, साधना संकीर्तन जप यासह विविध देखावे साखारले होते. तसेच घोडयावर स्वार शिवाजी महाराजांची वेशभुषा शिवव्याख्याते दत्ताञय श्रावण मांडोळे, घोडयावर स्वार झाशीची राणी यांची वेशभुषा कोमल नेहरु पाटील यांनी साकारली होती. हे सर्व देखावे शोभायाञेत आकर्षण ठरले. व दगडू पाटील धरणगाव, रवींद्र पाटील पारोळा , उत्तम बोरसे चाळीसगाव,दिलीप पवार पाचोरा ,बिहारी पाटील पाचोरा , राजेंद्र पाटील, धरणगावचे नाना काटे, जामनेरचे डाॅ. परदेशी, एरंडोलचे भरत महाजन, गोंडगाव गावातील स्थायी समिती अशोक पाटील, रामचंद्र पाटील, अरुण थोरात, भागवत पाटील, बारकू पाटील,, नामदेव सोनार , धर्मराज पाटील, सूर्यकांत पाटील, गणेश वाणी, सुनील पाटील,,पांडुरंग पाटील, विजय ठाकूर, हरी पाटील, राजु पाटील , पि के मोरे , बोदर्डे येथील गुलाबराव चिंतामण पाटील, बांबरुड प्र ब येथील भिकन दयाराम पाटील, दारासिंग चिंधा पाटील, मुरलीधर पाटील,भिमराव कोळी ,पिंन्टु पाटील, विजय पाटील, सतीष पाटील, मुरलीधर पाटील ,विजय साळुंखे, दत्तु मांडोळे, सुनिल टेलर, नाना चौधरी, गोंडगाव लोकनियुक्त सरपंच शिवाजी पाटील, राहुल युवराज पाटील, राहुल नेहरू पाटील, हरीश पाटील, रतिलाल पाटील , कन्हैय्या ठाकुर, विनायक पाटील, संजय मांडोळे, भागवत पाटील, राहुल सोनार, अरुण वाणी, गणेश वाणी, व गोंडगाव मधील जयबाबाजी परिवार व ग्रामस्थ , परिसरातील जय बाबाजी भक्त परिवार आनंद उत्सवात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी स्वरांजली ग्रुप मध्ये कन्हैया ठाकूर वेरुळ येथील संकेत पाटील , हनुमान खेडे येथील विकास पाटील व सर्व टीम यांनी बाबांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सुञसंचलन जेष्ठ गुरु बंधु शिवा अंगुरगावकर यांनी केले. तर आभार माजी मुख्याध्यापक पि के मोरे यांनी मानले. या सोहळा कार्यक्रमास जळगाव, धुळे जिल्हा, गोंडगाव परीसरातील बाबाजी परीवाराचे भाविक, महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. बाबाजींचा ३३ वा पुण्यस्मरण सोहळा हा खान्देशात घेण्यात यावा. या विजयकुमार सुदर्शन अहिरे यांच्या त्यावेळी मांडलेल्या संकल्पनेतुन गोंडगावी हा पुण्यस्मरण सोहळा कार्यक्रम बाबाजींच्या आशिर्वादाने होत असल्याचे बाबाजी परीवाराचे सोहळयाचे अध्यक्ष गणेश अहिरे यांचेसह भाविकांनी दै. लोकमतशी बोलतांना सांगीतले.

सुरुवातीला बाबाजींच्या पालखीचे पुजन बाबाजी परीवाराचे सोहळयाचे अध्यक्ष डॅा गणेश अहिरे यांनी केले. हा सोहळा यशस्विततेसाठी जय बाबाजी भक्त परीवार व आयोजन समितीच्या पदाधिकार्यांनी विशेष परीश्रम घेतले. या सोहळयास तालुका सेवेकरी, सह सेवेकरीही उपस्थित होते.

दुनियामे बहोत संत है मगर बाबाजी जैसे नही —

तसेच यावेळी व्यासपिठावर श्री. शांतीगीरीजी महाराज, पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश पाटील, पाचोरा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, डाॅ. भुषण मगर, दत्ताञय मांडोळे यांचेसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री. शांतीगीरीजी महाराजांनी ओम जनार्दना नमा, श्री. काशीविश्वेश्वराय नमा आदि जय नामाचा जयघोष करीत भक्तीगीतेही सत्संगातुन सादर केली. प्रवचनात बोलतांना श्री. शांतीगीरीजी महाराज म्हणाले कि, बगीचे मे फुल है तो गुलाब जैसा नही. मगर दुनियामे बहोत संत है बाबाजी जैसे नही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे राष्टृहीत जोपासत, हिंदु संस्कृतीची पताका फडकवुन हिंदु धर्माचे रक्षण त्यांनी केले. असे मोदीजींचे अनमोल कार्य आहे. याचा आदर्श राजकीय मंडळींनी घ्यावा. असे आवाहनही श्री. शांतीगीरीजी महाराज यांनी केले.बाबांजींनाही वाटले नव्हते कि अयोध्येत श्रीराम मंदीराची उभारणी केली जाईल. माञ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीराम मंदीराची उभारणी केली. त्यांचे आभार मानले. या मंदीराला जय बाबाजी भक्त परीवारामार्फतही देणगी देण्यात आली होती. असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले हिंदु धर्माच्या नावावर सर्व एकञ येत एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाले. असेही शेवटी सांगत भक्ती गीत संगीताच्या तालावर सादर करण्यात आले. यावेळी आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, दत्ताञय मांडोळे आंदिंनी मनोगत व्यक्त केले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad


 

Pages