नाशिकमध्ये वर्चस्ववादातून सराईत गुन्हेगाराला संपवलं°°°°
प्रत्यक्षदर्शीची भीतीनं गाळण उडाली.!!!
नाशिक प्रतिनिधी :-
शहर परिसरात गुन्हेगारी नित्याची झाली आहे. चोरी, घरफोडी, मारहाण या घटना तर राजरोसपणे घडत आहेत.अशातच अंबड परिसर खुनाच्या घटनेने हादरला आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणांमध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. तसेच खून करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचत अटक केली. मात्र या घटनेने परीसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नाशिकचा गजबजलेला परिसर म्हणून ओळख असलेल्या अंबड परिसरात राहणाऱ्या सराईत गुन्हेगार अक्षय जाधवचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री डोक्यात कोयत्याचा वार करत हल्ला करून अक्षय जाधवचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. अक्षय जाधव हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्यातूनच हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर अंबड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत लगोलग दोन संशयितांना ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरु आहे.
दरम्यान घटनेनंतर ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये तन्मय गोसावी आणि आकाश साळुंखे यांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तन्मय गोसावी व आकाश साळुंखे हे अंबड परिसरातील महालक्ष्मी नगर येथील आरोग्य केंद्राच्या समोर बसलेले असताना अक्षय उत्तम जाधव हा त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला. यावेळी त्यांच्यात वाद झाले असता संशयित तन्मय गोसावी याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने अक्षय जाधव याच्या डोक्यात वार केला. दरम्यान अक्षय च्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्याने तिथून पळ काढत समोर असलेल्या घराच्या बाल्कनीत पळाला. त्याचबरोबर गोसावी व साळुंखे हे त्याच्या मागे पळाले व पुन्हा एकदा अक्षयच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याच्या डोक्यात दगड मारला.
विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांमधून एका प्रत्यक्षदर्शीने अक्षयला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयित त्याला मारतील या भीतीने तो तिथून पळून जाऊन अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. अंबड पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यानंतर अंबड पोलिसांनी जखमी अक्षय जाधव यास तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अक्षयला मृत घोषित केले. दरम्यान मयत अक्षय जाधव विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, जबरी चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या घटनेत नेमकं काय घडलं याचा पोलीस सखोल तपास करत असल्याची माहिती आहे.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा