बोदवड तालुक्यातील येवती येथील मूळ रहिवासी कु. ऋतुजा पाटील हीचे पुष्पगुच्छ देऊन माननीय महोदय आमदार चंद्रकांत पाटील यांनी येवती येथील रघुनाथ पाटील यांच्या परिवाराची सदिच्छा भेट घेतली.
जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर
ऋतुजा पाटील ही मा. राष्ट्रीय काँग्रेस युवा जिल्हा अध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांची पुतणी आहे.
कु. ऋतुजा पाटील हीणे विविध प्रकारच्या स्केटिंग स्पर्धेत चार सुवर्णपदके पटकावून गाव तालुका राज्यच नव्हे तर भारताचे व पूर्ण देशाची मान उंचावली. ऋतुजा पाटील हिचे आई-वडील सध्या स्थिती पुणे भोसरी येथे नोकरीनिमित्त स्थानिक झालेआहे. ऋतुजा लहानपणापासूनच हुशार परंतु परिस्थिती खूप बेताची पण आपल्या दोन्ही मुलींना चांगलं शिक्षण देण्याचे स्वप्न तिचे आई-वडील पाहत होते.
दरम्यान मालदीव येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत भारताकडून तीन स्पोर्ट्स एल यु टी इंडिया तर्फे ऋतुजा हिला संधी मिळाली. २४ ते २५ सप्टेंबर रोजी मालदीव येथील माले सिटी व हूलहू माले सिटी येथे रोलर स्केटिंग असोसिएशन ऑफ मालदेव स्केटिंग फेडरेशन तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अनेक देशातील १२३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.याच्यात पहिला क्रमांक पटकावून आपल्या परिवाराचे नाव लौकिक केले त्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांनी ऋतुजा व परिवाराचे भरभरून कौतुक केले व अभिनंदन ही व्यक्त केले यावेळी बोदवड नगर पंचायतचे अध्यक्ष आनंदा पाटील , प्रा. हितेश पाटील,दीपक माळी, सईद बागवान, दिनेश माळी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा