ना मंगनी,ना बारात, ना खाना,सिर्फ कबुल है,कबूल है - म्हणत निकाह (विवाह) संपन्न.!!!
जिल्हा प्रतिनिधी :-
मनियार बिरादरी च्या प्रमुखांनी केला एतेहासिक विवाह
जळगांव व भुसावल येथील दोन नातेवाईक मंडळी आपले हितसम्बन्ध जोपासत असताना त्या कुटुंबातिल तरुण व तरुणी हे उच्च शिक्षण घेतलेले होते. मुलाचे वडील नसल्याने त्यांच्या तर्फे बिरादरी चे जिल्हाअध्यक्ष फारूक शेख यांनी मुलींचे नातेवाईक व जळगाव शहर अध्यक्ष सैयद चाँद यांच्या समोर या दोघांचा विवाहाचा प्रस्ताव दिला. सैयद चाँद यांनी मुलींचे वडील व नातेवाइकांशी चर्चा केली व या विवाहास त्यांनी होकार दिला..
निकाह ची करवाई°°°°
रविवार ३० ऑक्टोबर रोजी जळगाव येथील मेहरूण मस्जिद ए उमर मधे अक्सानगर, मेहरूण जळगांव येथील बुशरा परवीन शेख हारून हीचे लग्न भुसावल येथील मोहम्मद आवेज अब्दुल सत्तार यांच्याशी शहर ए काज़ी मुफ़्ती अतिकुररहेमान यांनी लावले.
कबुल है, कबुल है°°°°
वधु बुशरा ची सम्मति नंतर वर आवेज ला मुफ़्ती आतिक यांनी विचारणा केली की बुशरा ने आपणा सोबत १५०००/- रु मेहर घेऊन निकाह ची परवानगी दिली आपणास मान्य आहे का? त्यावर आवेज यांनी १५ हजार च्या एवजी सुवर्ण आभूषण देऊन कबुल है, कबुल है असे सांगितले असता ख़ुत्बे ए निकाह सादर करून निकाह (लग्न) लावण्यात आले.
या निकाह साठि वकिलाची भूमिका सय्यद चाँद अमीर जळगाव यांनी बजावली तर साक्षीदार म्हणून भुसावळचे खालीलउल्लाह शेख व हाजी नूर मोहम्मद हे होते.
ना मंगनी,ना खाना, ना बाराती ... फक्त ३० लोकाच्या उपस्थित लग्न°°°°°
दिवाळी च्या सुटित मुस्लिम समाजात सर्व दूर मोठ्या प्रमाणात २ ते ३ हजार लोकांची जेवणावली सुरु असून अशा वेळी कोणतीही मंगनी (साखरपुडा), बाराती व जेवणावळीला फाटा देत लग्न झाल्याने मनियार बिरादरीच्या या एतेहासिक लग्नची चर्चा सर्व दूर सुरु आहे.
निकाह साठि यांचे लाभले सहकार्य°°°
मुला कडील भुसावळचे मोहम्मद साजिद, मोहम्मद आबिद, मोहम्मद मजीद, मोहम्मद जुनेद, हसन रजा व वर मोहम्मद आवेज ची आई नसीम बानो बांधू तर मुली तर्फे वडील शेख हारून राशिद, शेख इस्माईल, तौफीक शेख, मोहम्मद हनीफ ,जाकीर मुनीर, रफिक शेख, अब्दुल मजीद कादर, आवेज ची आई फरजांना परवीन या निकाह यशस्वीतेसाठी मनियार बीरादरीला सहकार्य केल्या बद्दल फारूक शेख यांनी आभार मानले.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा