नगरदेवळा ता पाचोरा येथील लोकप्रिय, युवा नेतृत्व, राष्ट्रवादीचे कट्टर पदाधिकारी माननीय श्री योगेश सुभाष महाजन यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा व भव्य खोके तुला.!!!
आज नगरदेवळा राष्ट्रवादी शहर कार्यकारणी तर्फे लोकप्रिय, युवा नेतृत्व, राष्ट्रवादीचे कट्टर पदाधिकारी माननीय श्री योगेश सुभाष महाजन यांचा वाढदिवस एक अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. राज्यातील खोके सरकारचा निषेध नोंदवण्याचा या मागचा मुख्य उद्देश होता. त्यानुषंगाने श्री योगेश सुभाष महाजन यांची पन्नास खोके एकदम ओके असे नाव असलेल्या 50 खोके घेऊन तुला करण्यात आली.राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तसेच चौदा हजार जवानांची पोलीस भरती तडका फडकी स्थगित करण्यात आली. आणि आपल्या राज्यातले मोठे मोठे उद्योग गुजरातला हलवण्यात आले याचा निषेध नोंदवण्यासाठी ही अनोखी खोके तुला करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष विलास राजाराम पाटील, विकासो चेअरमन मुन्ना काका परदेशी, व्हाईस चेअरमन कैलास पाटील,शहराध्यक्ष सुनील तावडे, तंटामुक्ती अध्यक्ष किरण आप्पा पवार, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रज्जाक शेख, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विलास सोनवणे, युवती जिल्हाध्यक्ष अभिलाषा रोकडे, माजी विकासो चेअरमन मोहन तावडे, पिटीसी संचालक राकेश बाबा थेपडे,कार्याध्यक्ष सचिन गढरी, उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, पिंटू तात्या सोनी,अशोक सोनी, इंद्रनील भामरे, कडू आबा पाटील, उत्तम सुमारे, अनिल पाटील, अण्णा महाजन, दादा मिया पिंजारी, दिनेश महाजन, ईश्वर मांडोळे, समाधान पाटील, सुरेश बागुल, भिका पाटील, काशिनाथ फाजगे, संदीप परदेशी, शरद कोकंदे , जिभू महाजन, नाना पाटील, सुरेश पहिलवान, संजय पाटील, सतीश म्हसकर, युवक तालुकाध्यक्ष अभिजीत पवार, ग्रामपंचायत सदस्य सुनील महाजन तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे विकी जाधव, सोमा महाजन मुकेश राजपूत, जिभू गुंजाळ, अमित टेलर, मनोज गुरव, योगेश समारे, एम आय एम पक्षाचे उप तालुका प्रमुख एजाज शेख, गुलाब पिंजारी शहर अध्यक्ष, शाहरुख खानआकाश चौधरी ,दिनेश ठाकूर, सागर धनगर ,सचिन पाटील ,प्रमोद पाटील, असे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा