जामठी येथे एका च रात्री 5 दुकाने फोडली.!!!
जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर
जामठी ( ता बोदवड) येथे शुक्रवारी रात्री पाच दुकाने फोडण्यात आली या दुकानांमधून चोरट्यांनी रोख रक्कम व मुद्देमाल मिळुन ७२ हजारांचा ऐवज लांबवला पोलीसांनी पथकाद्वारे चोरट्यांचा माग काढुनही उपयोग झाला नाही जामठी येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी बस स्थानक भागातील पाच दुकाने फोडल्याचे शनिवारी सकाळी उघडी च आला यात बस स्थानक परिसरातील अमोल प्रोव्हीजन या किराणा दुकानातिल १४ हजार रुपये रोख व ५ हजार किंमतीचे सीसीटीव्हीच डीव्हीआर सुकामेवा लंपास केल्याचे दुकान मालक काशिनाथ गुलाबचंद तेली यांनी फिर्यादीत म्हटले आहे या दुकानासमोरील महाजन कृषी केंद्र येथील २१हजार ६०० रुपये रोख लंपास केल्याची फिर्याद कुणाल भगवान महाजन यांनी दिली तसेच साई राणा कृषी केंद्र तिल सुमारे ५ हजार रोख व तेवढ्याच किमतीचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी लंपास केला कृषी केंद्र चालक सुरेंद्र उमरावसिंग पाटील यांनी ही फिर्याद दिली तसेच संदिप विठ्ठल माहजण यांच्या ग्राहक सेवा केंद्रातुन ८ हजार रुपये रोख व ५ हजारांचा डिव्हीआर चोरीला गेला सद्गुरू जनरल स्टोअर्स मधील अडीच हजार रोख व इतर साहित्य लांबण्यात आले चोरिचा घटना सीसीटीव्हीत चित्रित होऊ नये म्हणून यासाठी चोरट्यांनी सर्व ठिकाणचे डिव्हीआर चोरुन नेले श्वान पथकांची मदत घेतली तसेच वेगवेगळ्या गुन्ह्यातील संशयितावर देखील पोलिसांची नजर आहे










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा